डोंगरी येथे राष्ट्रीय एकताच्यावतीने २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : “आत्मा ही नहीं, दिल भी रोता है। जब देश का कोई जवान शहीद होता है। सर झुके बस उस शहादत में, जो शहीद हुए हमारी हिफाजत में।”

अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अर्थात “राष्ट्रीय एकता ” च्या वतीने सना कम्युनिटी हॉल, डोंगरी, मुंबई ४०० ००९ या ठिकाणी २६/११/ २००८ ला मुंबई शहरात आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शुरविरा निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा व संविधान दिवसानमिमित्त संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. आली.

dongari-26-11

या प्रसंगी लंडन स्थित प्रसिद्ध उद्योजक, लेखक सय्यद चिश्ती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ही ग्रीन वेल्फेअर फाउंडेशनच्या सौ. शहीदा दरबार, २६/११ चे साक्षीदार व पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष हुसेन शेख, उपाध्यक्ष संजय बन्सल, महाराष्ट्र सरचिटणीस हरिकेश जैसवार, मुंबई जिल्हा अध्यक्ष शोएब अहमद, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष गुलफाम सुलेमान, ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश सुर्वे, वसई महिला अध्यक्षा सौ. भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here