यावल (तालुका प्रतिनिधी डॉ. मोहन साळुंखे) : ३ डिसेंबर ‘जागतिक दिव्यांग दिना ‘चे औचीत्य साधुन दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन यांच्या मार्गदर्शना ने यावल ता.दिव्यांग सेनेच्या प्रयत्नाने यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यासाठी यावल तालुकाध्यक्ष योगेश (मुन्ना) चौधरी,फैजपूर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष नितीन महाजन, जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, फैजपूर उपाध्यक्ष ललित वाघुळदे, जि.संघटक नाना मोची, ता.उपाध्यक्ष अशोक कोळी, ता.सचिव चेतन तळेले, यांनी वेळोवेळी यावल तहसीलदार व पुरवठा अधिकारी याचेकडे पाठपुरावा केला.अखेर दिव्यांग दिनी तहसीलदार महेश पवार यांचे हस्ते यावल तालुक्यातील फैजपूर ,पिंपरुड, विरोदा येथील दिव्यांग बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
तहसीलदार महेश पवार यांनी दिव्यांग बांधवांना ‘ जागतिक दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश पवार तहसीलदार,रविंद्र भंगाळे पुरवठा अधिकारी,यावल लिपिक शेख दादा, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, तालुकाध्यक्ष मुन्ना चौधरी, जि.सल्लागार राहुल कोल्हे, ता.उपाध्यक्ष अशोक कोळी, सचिव चेतन तळेले, संजय वानखेडे,गणेश भारंबे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.






