जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यात पिस्तुल विक्री करणार्य तरुणास पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली. दरम्यान मध्यप्रदेशातील उमर्टी हे गाव अवैध पिस्तुल तयार करण्यासाठी प्रसिद्ध है आहे. तेथुन तो आणत असल्याचे समोर आले. असुन त्याच्याकडुन पिस्तुल व दोन मैगझीन जप्त केले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरजीतसिंह अकबरसिंह बरनाला (वय-३६) रा. उमर्टी. ता. वरला, जी. बडवानी , मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बरनाला हा स्वत: घरी पिस्तुल तयार करतो. या पिस्तुल विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. झडली घेतली असता त्याच्या ताब्यातुन एक पिस्तुल व दोन मैगझीन असा ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला आहे.
बरनालाविरुद्ध चोपडा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरनालाची चौकशी केली असता तो बनावट चाव्या तयार करण्याचे काम करीत असल्याची महिती समोर आली आहे. त्यामुळे चोरटे , घरफोडी करणारेही त्याच्या संपर्कात असण्याची शक्यात आहे. दरम्यान , तो घरीच पिस्तुल तयार करीत असल्याची महिती मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.






