आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पेपर फुटी प्रकरणात नौदलातील खलाशी अटकेत

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून या प्रकरणात पोलिसांनी प्रकरणात नेव्हल डॉकयार्डमध्ये (नौदल) खलाशी म्हणून कार्यरत असलेल्या एकाला अटक केली आहे. तो आरोपींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश दिगंबर मिसाळ (वय-४० रा. वराळे, ता. मावळ) याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी विजय प्रल्हाद मुर्‍हाडे (वय-२९, रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना), सुरेश रमेश जगताप (वय२८, रा. बोल्हेगाव, ता घनसांगावी, जि. जालना), संदिप शामराव भुतेकर (वय ३८, रा. सातारा परिसर, औरंगाबाद), अनिल दगडू गायकवाड (वय ३१, रा. किनगांववाडी, ता. अंबड), बबन बाजीराव मुंढे (वय ४८, रा. पळसखेड झालटा, ता. देउळगाव राजा, जि. बुलढाणा) आणि यांना अटक करण्यात आलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या प्रकाश मिसाळ याचा मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याने आणखी कोणाला पेपर पाठवला आहे का? याचा तपास करणे. तसेच मिसाळ याला पेपर पुरवणारा आरोपी याचाही माहिती मिळवायची आहे. अटक आरोपीने पेपर मिळवण्यासाठी तसेच पेपरचे वितरण करण्यासाठी इतर कोणत्या साथीदाराच्या संपर्कात होता त्याचे शोध घेणे, आरोपीकडून मूळ हस्तलिखित प्रश्नोत्तर स्वरुपातील पेपर हस्तगत करुन त्या प्रमाणे हस्ताक्षरांचे नमूने घेयचे असल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी करुन न्यायालयाकडे आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here