जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : दि.०५/१२/२०२१ रोजी रिध्दी जान्हवी फाऊंडेशन पोलंन पेठ,161,दाणा बाजार जळगावच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांच्या रिध्दी जान्हवी फाऊंडेशन तर्फे दाणा बाजार येथील हनुमान मंदिराजवळ भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे संचालन सौ.दीपा तापडिया यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार राजू मामा भोळे(जळगाव)हे उपस्थित होते.त्यांच्या सोबत विजय भाऊ बांदल (शिवसेना विभाग प्रमुख शिवाजीनगर) हे ही उपस्थित होते .या दोघांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाला भक्त गणांचा मोठा पाठिंबा लाभला.
भक्ती संगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भक्तांनी भक्ती संगीताचा कार्यक्रम चालू असताना ठेका धरीत नाचून मनमुराद आनंद लुटला.कार्यक्रमाचे नियोजन क्राईम रिपोर्टर श्री.चंदन पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनाली कापुते यांनी केले. सतीश दायमा, पंकज दायमा, बंटी भाऊ बांदल,विकास भाऊ पाटील,यांनी कार्यक्रम पार पाळण्यासाठी परिश्रम घेतले.






