खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर ३५ वर्षीय किराणा दुकानदाराचा लैंगिक अत्याचार

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाऊ आणायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय किराणा दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर गावातील काही महिलांनी आणि तरुणांनी संबंधित दुकानदाराला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी आरोपी किराणा दुकानदार अभिजित सुभाष नाडगोंड (वय ३५) विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून किराणा दुकानदाराला अटक केली आहे.

ही घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी दुकानाची तोडफोड केली त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थती निर्माण झाली होती. यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आरोपीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीवर बाललैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सोमवारी दुपारी पीडित अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी आरोपीच्या किराणा दुकानात केली होती. यावेळी पीडित मुलीला एकटं पाहून आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने घरी येऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आपला भांडाफोड झाल्याचे समजताच आरोपीनं दुकान बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गावातील महिलांनी आणि काही तरुणांनी त्याची धरपकड करत त्याला चांगलाच चोप दिला तसेच त्याच्या दुकानाची तोडफोडसुद्धा केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे हाती लागल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here