‘बर्थडे’ पार्टीसाठी तळजाई जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कार

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुभम याने फिर्यादी तरुणीला ५ डिसेंबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तू तळजाई शेवटचा बसस्टॉप येथे ये असे सांगितले. त्याप्रमाणे ती सायंकाळी ५ वाजता तेथे आली. आरोपीने त्याचा मित्र प्रतिक माने व फिर्यादी यांना तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन ते अडीच तास दारु पित बसले होते.

फिर्यादी तरुणीला थंडी वाजत असल्याने ती कडेला झोपली असताना शुभम याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here