अल्पवयीन मुलीला नशेचं इंजेक्शन देऊन केला बलात्कार

बरेली (उत्तर प्रदेश) : ल्पवयीन मुलीला नशेचं इंजेक्शन देऊन एका मेडिकल दुकानदाराने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला बोलावून घेतलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले.शेजारी राहणाऱ्या मेडिकल दुकानदाराकडे विश्वासाने पाठवलेल्या मुलीसोबत त्याने विश्वासघात करत हे दुष्कृत्य केले. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे.




येथे राहणाऱ्या कुटुंबातील शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी नुकतीच क्लासवरून परत आली होती. आईसोबत ती घरी चालली असताना समोरच असलेल्या मेडिकल दुकानदाराने तिला बोलावले. काहीतरी काम असेल म्हणून तिच्या आईने तिला तिथेच सोडलं आणि ती घरी निघून गेली. दुकानदाराने मुलीला मेडिकल दुकानात बोलावलं आणि बसायला सांगितलं. गप्पा मारल्यानंतर मुलीचं लक्ष नसताना त्यानं अचानक एक नशेचं इंजेक्शन तिला टोचलं. नंतर मुलगी बेशुद्ध झाली. दरम्यान, दुकानाचं शटर खाली करून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. इतर व्यापाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. काहीजण मुलीच्या घरी गेले आणि याबाबत माहिती दिली.


काही वेळातच दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली आणि शटर उघडण्याचा प्रयत्न सर्वजण करू लागले. यावेळी दुकानदाराची आई आणि त्याचा भाऊ यांनी बाहेर जमलेल्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने शटर आतून बंद केल्यामुळे ते उघडलं जात नव्हतं. बाहेर गर्दी जमल्यावर आणि आरडाओरडा सुरू झाल्यानंतर देखील दुकानदारानं आपलं दुष्कृत्य सुरूच ठेवलं होतं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये अर्धनग्न अवस्थेतील बेशुद्ध पडलेली मुलगी त्यांना सापडली. पोलिसांनी मेडिकल दुकानदाराला अटक केली. त्याच्याविरोधात पॉक्सो अन्वये बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मुलीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here