दोंडाईचा (संतोष कोळी) – तावखेडा प्र.नं. येथील पांडुरंग पारखे ही व्यक्ती कोरोना ग्रस्त आढळुन आल्यावर त्यांना उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था झाली नाही म्हणून शेवटी त्यांचा मुलगा स्वतः दुचाकीने आपल्या वडीलांना घेऊन तो दोंडाईचा येथे आला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आईला व बहिणीला घेऊन आला
त्यांच्या या कामाची दखल घेऊन आमची सर्व टिम एक हात मदतीचा यांनी आज रोजी तावखेडा प्र.नं. येथे जाऊन गणेश पांडुरंग पारखे यांनी केलेली एका योध्दा सारखी कामगिरी पाहुन त्यांच्या कुटुंबाचे मनोबल व परिसरातील लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार केला.या कामासाठी आम्हाला सत्काररुपी विशेष मदत अनिस शहा व रोटरी क्लब दोंडाईचा यांची लाभली. प्रा. आप्पा कोळी, संदिप पवार, अर्जुन सैंदाने, हर्षल माळी, ॠषीकेष ठाकुर, हर्षदिप सोलंकी, कुणाल पाटील, श्रीकांत केसे सर, गावातील तरुण व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार कोरोनाग्रस्त कुटुंबाला दुचाकीवर दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या तरुणाला रोटरीचा मदतीचा हात







