जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : अप्पर पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य ,मुंबई ) विनय कारगावकर व पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक बी. जी.शेखर, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते शनिवारी (दि.११) रोजी पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस नाईक दर्शन ढाकणे व पोलीस नाईक प्रमोद दादा लाडवंजारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.






