खा.शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा : भव्य आतिषबाजी; चाहत्यांनी कापला ८१ किलोचा केक

कारंजा (प्रतिनिधी हाफीज खान) : स्थानिक ठाकरे पॅलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या व माजी मंत्री सुभाष ठाकरे वाढदिवसानिमित्त भव्य आतिषबाजी करून 81 किलोचा केक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मो. युसूफ पुंजानी व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, देवव्रत डहाके सह अन्य मान्यवरांच्या हस्ते सामूहिक रित्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मो.युसुफ पुंजानी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, युवा नेते देवव्रत डहाके, माजी जि.प. सभापती हेमेन्द्र ठाकरे , प्रदेश पदाधिकारी राजू गुल्हाने,वाहिददोदिन शेख,पप्पूसेठ हेडा,हाजी बाबू चाऊस,सुरेशराव गावंडे, यशवंतराव इंगळे, आशिष पाटील, संजय भुजाडे, रामदास भोरकडे, नितीन गाडगे, मनोज कानकिरड, सुभान कामनवाले,फारुख अली,शेखर काटोले,भास्कर पाटील,आर के राठोड,चंद्रकांत पाकधने,गोविंद घराणे,गोपाल भोयर,विवेक चव्हाण,राजू नेमाने,मोतीराम पाटील व सुखराम महाराज आदीची मंचकावर उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दोन्ही नेत्याच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांना अवगत केले. मो.युसूफ पुंजानी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 12 वाजता अचानक सर्व चौकांमध्ये भव्य आतिषबाजी सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात जणू दिवाळी सारखा वातावरण निर्माण झाला होता. यावेळी कारंजा नगर पालिकेचे सभापती, नगरसेवक व कारंजा मानोरा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार हेमेन्द्र ठाकरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here