लग्न करण्याचे आमिष दाखवत २९ वर्षीय महिलेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्‍यावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

विरभद्र सुधाकर खरोसे (वय ३७, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथील एका २९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

फिर्यादी महिला आपल्या मुलासमवेत फुरसुंगी येथे रहातात. विरभद्र खरोसे याने फिर्यादी यांना लग्नाचे आश्वास दिले. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे सांगून विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here