लग्नाच्या आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ; गुन्हा दाखल

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : सोबत काम करणाऱ्या तीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर ३० वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार आरोपी रितेशकुमार राजेंद्र लाड (वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे कल्याणीनगर परिसरातील एका आस्थापनेत काम करतात. तेथे त्यांची ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि वाघोलीतील एका फ्लॅटवर घेऊन जात तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर मात्र आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करण्यास टाळाटाळ करून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. सुरुवातीला हा गुन्हा मध्यप्रदेशातील खंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. तिथून तो लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here