नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : येथील एका पाचवीच्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. ‘क्राईम पेट्रोल’ पाहून तिने आत्महत्या केली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये सोमवारी ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घरामध्ये कोणीही नसताना तिने हे कृत्य केलं आहे. मुलगी नेहमीच क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया पाहायची. त्यामुळे यातूनच तिने आत्महत्या करण्याची पद्धत पाहिली असेल असा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील आणि कुटुंबात असलेले इतर सदस्य हे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी मुलीला देखील आपल्या सोबत येण्याचा खूप आग्रह केलाय. पण तिने कार्यक्रमासाठी जाण्यास नकार दिला. दुपारच्या वेळेस जेव्हा कुटुंबीय कार्यक्रमावरून घरी परत आले. तेव्हा त्यांनी मुलीच्या रुमचा दरवाजा हा बंद दिसला. त्यांनी दार उघडण्यासाठी दरवाजा ठोकला, पण आतून मुलीने काहीच प्रतिसाद आला नाही. रुममधून कोणताही आवाज येत नव्हता.
कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिलं असता. मुलगी सिलिंगच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मुलीला सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोले पाहणं खूप जास्त आवडायचं. ती पूर्ण दिवस याच सीरियल्स पाहायची. तिथूनच तिने आत्महत्या कशी करायची हे पाहिलं असेल अशी माहिती मुलीच्या एका चुलत बहिणीने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.






