बिअर बार मालकाच्या मित्रांची वाईट नजर टाळण्यासाठी महिला डान्सरने घेतली छतावरुन उडी

girl-sucide-by-building-jump

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : मनमानी करणारा बिअर बारचा मालिक आणि त्याच्या मित्रांच्या वाईट नजरेतून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका प्रोफेशनल डान्सरने इमारतीच्या छतावरुन उडी घेत आपला जीव दिला. राखी असे या डान्सरचे नाव असून ती दिल्लीतील बुध विहार येथील रहिवाशी आहे. डान्सरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बार मालक विजय आणि त्याच्या मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

रोहिणी सेक्टर ९ च्या नॉर्थ एक्स मॉलमधील बिअर बार (मास्टर द पार्टी हॉल) मध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बुध विहार निवासी डान्सर निशा आणि त्यांची लहान बहिण राखी उर्फ तान्या डान्स करण्यासाठी आल्या होत्या. या पार्टीत बारचे मालक विजय यांनी दोन्ही डान्सर्संना तब्बल ५ तास डान्स करायला लावला. त्यानंतर, साधारण साडे चार वाजता दोन्ही बहिणीकडे घराकडे निघाल्या असता, बार मालक आणि त्यांच्या मित्रांनी दोघींना रोखले. तसेच, पुन्हा डान्स करण्याची जबरदस्तीही केली. यावेळी, राखीने थांबण्यास नकार दिला असता, तिला गराडा घालून तिच्याशी अश्लील वर्तन करण्यात आल्याचे राखीची बहिणी निशाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बार मालकांच्या मित्रांकडून होणाऱ्या अश्लील गैरवर्तनापासून स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी राखीने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन उडी घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या राखी आणि निशाला आंबेडकर रुग्णालयाबाहेर सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. रुग्णालयात डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले. त्यामुळे, शवविच्छेदनानंतर पोलिसांनी राखीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, पोलिसांकडून बार मालकाची कसून चौकशी करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here