तपासणीचा बहाणा करत कंपाउंडरने केला महिलेचा विनयभंग

उदगीर (प्रतिनिधी) : येथील सामान्य रुग्णालयातील कंपाउंडरने प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांची तपासणी करण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. त्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात १३ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास उदगीर शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव करीत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विविध पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकामार्फत गुन्ह्यातील फरार आरोपीचा वेगवेगळ्या ठिकाणी पथकामार्फत शोध सुरू होता.

पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने फरार आरोपी सचिन राजमाने याला २० तासात अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here