वायू सेनेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

fruad

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : वायू सेनेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2017 ते 14 डिसेंबर 2021 या कालावधीत रामनगर, पिंपरी येथे घडली.

 

दिनदयाळ बधीराम प्रसाद (रा. रामनगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 15) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप प्रसाद कुमार, नरसिंग सुदामा प्रसाद आणि एक महिला (तिघेही रा. मापसा, गोवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी दिनदयाळ यांना वायू सेनेत नोकरी लावतो असे आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी आरोपींनी वायू सेनेच्या बोधचिन्हाचाही वापर केला. बनावट कागदपत्र तसेच ईमेल आयडी तयार करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी नोकरीबाबत विचारले असता ‘आज होईल, उद्या होईल’ अशी उडवाउडवीची आरोपींनी उत्तरे दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here