- पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना
पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : सेल्फी घेऊन तो आईवडिलांना दाखवून बदनामी करतो, अशी धमकी देऊन एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जनार्दन केशव गोवंदे (रा. मगरपट्टा, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीबरोबर सेल्फी फोटो घेतला होता. तो सेल्फी फोटो आई वडिलांना दाखवितो व तुझी बदनामी करतो, अशी धमकी त्याने या मुलीला दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईने फिर्याद दिली.






