पुण्यात डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करत तरुणाचा खून

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे डोक्यात लोखंडी रॉडने वार करत एका तरुणाचा निर्घृणरित्या खून करण्यात आलाय. तर एक जण या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे.राजगुरुनगर शहराजवळच्या होलेवाडी येथे ही घटना घडली.

रामदास सोपान थिटे (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तात्रेय टाकळकर यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या सुमारास दारू पिऊन भांडण झाल्याने हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. यामध्ये दोघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here