क्रिकेटच्या वादातून डोक्यात घातली बॅट; आठ दिवसांनी पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील सती येथे क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या डोक्यात बॅट घातल्याची धक्कादायक घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. यामध्ये लहुकुमार अनुपकुमार वर्मा (१५, रा.

सती विद्यानगर) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आठ दिवसांच्या संघर्षानंतर बुधवारी लहुकुमारची प्राणज्योत मालवली.

या घटनेत एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार लहुकुमारची आई संगीता अनुपकुमार वर्मा (४० रा.विद्यानगर) यांनी अल्पवयीन मुलांच्या विरोधात फिर्याद चिपळूण पोलिसांना दिली. वर्मा कुटुंबियांचा एकुलता एक ऐन उमेदीला मुलगा गेल्याने वर्मा कुटुंबियांवर खूप मोठ संकट ओढवला आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह गुरुवारी घरी आणला असता ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here