भोपाळ (प्रतिनिधी) : – राजधानी भोपाळमध्ये घरासमोर खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकल्याचा शेजारच्या महिलेने निर्घृण हत्या केली. महिलेने त्याचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर भावाच्या मदतीने चिमुकल्याचा मृतदेह गोणीत लपवून ठेवला.
त्याची पोलखोल सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. बुधवारी दुपारी जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या घरासमोर ५ वर्षाच्या मुलगा खेळत असे. त्यामुळे मुलाच्या घरच्यांसोबत तिचे रोजच वाद होत होते. हा वादच चिमुकल्याच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महिलेने तिच्या भावाच्या मदतीने मुलाची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, जेलरोडवरील जादा कॉलनीत राहणारा जावेद खान हा टेलर आहे. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा फरदीन सन टॉप स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता. बुधवारी दुपारी तो घरासमोर खेळत होता. आई शाहिदा घरातच होती. दरम्यान, शाहिदा बाहेर मुलाला पाहण्यासाठी आली. तेव्हा तिला तिचा मुलगा दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला, पण फरदीनचा सुगावा लागला नाही. मुलगा कुठेच न सापडल्याने तिने चार वाजता पती जावेदसह जहांगीराबाद पोलीस ठाणे गाठले.
सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले रहस्य
मुलाच्या हरवल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी तपास सुरू केला. हत्येचा खुलासा करताना परिसरातील एका मुलाकडून आणि सीसीटीव्हीवरून पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. पोत्यात भरल्यानंतर फरदीनला ऑटोमध्ये नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलाने पोलिसांना सांगितले. फरदीनच्या घरासमोर राहणाऱ्या समरीनवर पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तिला बोलावून घेतले. यावर ती टाळाटाळ करू लागली. पोलीस तात्काळ समरीनचे मामा चोला यांच्याकडे पोहोचले. जिथे फरदीनचा मृतदेह त्याच्या घरात एका गोणीत सापडला होता. पोलिसांच्या चौकशीत समरीनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने वायरने फरदीनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. भाऊ फरजान याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.






