उसने दिलेले पैसे मागितल्याने मामीला दगडाने मारहाण

marhan

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मामीला भाच्याने दगडाने मारहाण केली.तसेच घरी येऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.ही घटना 12 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता सहयोगनगर, तळवडे येथे घडली.

संकेत भरत गोगावले (वय 28, रा. मोरेश्वर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंदा निवृत्ती नखाते (वय 67, रा. सहयोगनगर, तळवडे) यांनी बुधवारी (दि. 15) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत हा फिर्यादी यांचा भाचा आहे. संकेत याला फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत नखाते याने मागील महिन्यात एक लाख रुपये टप्प्या टप्प्याने कामासाठी दिले होते. ते पैसे फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी संकेतकडे परत मागितले. संकेतने सुरुवातीला फिर्यादी यांच्या मुलाचा फोन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रशांत यांनी संकेतच्या आई वडिलांना पैशांबाबत माहिती दिली.

त्या कारणावरून संकेत 12 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन शिवीगाळ करू लागला. ‘तू पैसे घेतल्याचे घरी का सांगितले. मी आता तुला पैसे देत नाही’ असे म्हणत संकेतने प्रशांत यांना धमकी दिली. त्यानंतर पार्किंगमध्ये पडलेले दगड उचलून फेकून मारले. त्यात फिर्यादी यांच्या नाकाला दगड लागून जबर दुखापत झाली आहे. चिखली पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here