100 रुपये देऊन तोंड बंद ठेवण्याची धमकी देत 8 वर्षीय बालकासोबत केले अनैसर्गिक अत्याचार

बुलढाणा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. पुणे आणि सातारा येथे लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता बुलढाणामध्ये अशीच घटना घडली आहे.यामध्ये एका 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केला आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलगा झाडाखाली खेळत असताना त्याला 25 वर्षीय तरुणाने आपल्या घरात बोलावले आणि मग त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. या आरोपी नराधमाचे नाव रवींद्र उर्फ विक्की नाना ठाकरे असे आहे. या नराधम आरोपीने पीडित मुलाला पैशाचे आमिष दाखवून त्याच्यावर अत्याचार केले.

त्याने या कृत्यानंतर पीडित मुलाला 100 रुपये देऊन घडलेल्या घटनेसंदर्भात कुणाला सांगू नको अशी तंबी दिली. पण या मुलाने धमकीला न घाबरता घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने तातडीने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित मुलाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गावातील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here