किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार

knife-attack

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना नागसेननगर झोपडपट्टी येथे बुधवारी (दि. 15) दुपारी घडली.

किरण रमेश सौंदरकर (वय 30, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश गायकवाड (रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.15) दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी किरण हे नागसेननगर झोपडपट्टी येथे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी गायकवाड याने ‘तू आप्पा कसबेसाठी काम करतो का?’ असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडे असलेला चाकू काढून त्याने फिर्यादी यांच्या डोक्‍यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here