घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार; एकास अटक

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.16) दुपारी सुसगाव पुणे येथे घडली.

राजेंद्र नागनाथ जाधव (वय 40, रा. संजिविनी दवबिंदू सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी जाधव हा त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. दरवाजा आतून बंद करत त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here