प्रेयसीने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या

knief-attack
file photo

बिहार  ( विशेष प्रतिनीधी ) बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून प्रेयसीने आपल्याच प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचे समोर आले आहे.

एक आठवड्यापूर्वी पूर्णिया सदर ठाण्यातील गुलाबबाग येथील रहिवासी संपत पासवान हा बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता त्याचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरातील बेडरूमधून ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर ठाण्याचे एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून संपत पासवान याची हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की आरोपी आशा देवी हिने संपतचा मृतदेह घरातील बेडखाली पुरला. एसडीपीओनी सांगितले की, संपत हा आठवडाभरापूर्वी बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची सूचना पोलीस ठाण्यात दिली होती.

संपत पासवा यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच मोबाईलच्या सीडीआरवरून आशा देवी हिला अटक केली. मृत संपत पासवान याचा मुलगा सन्नी पासवानने सांगितले की, त्याचे वडील आठवडाभरापासून बेपत्ता होते. आठवडाभरापूर्वी ते घरातून जमीन मापण्याची गोष्ट करून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांना खबर दिली गेली. आशा देवी हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिने गुन्हा कबूल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here