उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना ग्रंथालय सेनातर्फे अनुदान वाढीकरिता निवेदन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना ग्रंथालय सेनातर्फे अनुदान वाढी दर्जाबद्दल व नवीन मान्यता देणे संदर्भात निवेदन सादर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता अनुदान वाडी संदर्भात ,दर्जाबद्दल संदर्भात नवीन मान्यता संदर्भात ग्रंथालय सेनेची उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लेखी निवेदन दिले.

गेल्या बारा वर्षापासून सार्वजनिक वाचनालय यांना नवीन मान्यता देणे ग्रंथालयांच्या दर्जाबद्दल व अनुदान वाढ हा प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्रात बारा हजार ग्रंथालय असून तेवीस हजार ग्रंथालय कर्मचारी आहेत अतिशय कमी अनुदानावर कर्मचारी काम करीत असून हळूहळू ग्रंथालय चळवळ ही लयास येत आहे वास्तविक पाहता अनेक अनेक जिल्हा नियोजन मंडळात निधी उपलब्ध असतो प्रत्येक जिल्ह्यात हा प्रश्न मार्गी लावण्याकरता भक्तिगीत जिल्हा नियोजन समितीला शासनाने नियोजन विभागाला आदेश दिलेत ग्रंथालयाच्या प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकेल येत्या अधिवेशनात तीनही हे प्रश्न उपस्थित करून हे मार्गी लावावे अशा आशयाचे निवेदन ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्र प्रमुख पाटील सर यांनी दिले.

निवेदन देतेवेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार दादा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here