पिंप्राळ्यातील तरुणाला चौघांची बेदम मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : शहरातील रेडक्रॉस सोसायटील रस्त्याने जावेद पिंजारी (वय २८) हा दुचाकीने जात होता.यादरम्यान, चौघांकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.या प्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, पिंप्राळ्यातील वेल्डिंग कामगार जावेद सिकंदर पिंजारी (वय २८) हा तरुण शुक्रवारी रेडक्रॉस सोसायटी जवळील रस्त्याने त्याच्या (एमएच १९ एएफ ८०१५) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. यादरम्यान अचानक डिव्हायडर ओलांडून जावेदच्या दुचाकीसमोर एक अनोळखी तरुण आला. दुचाकीसमोर आलेल्या तरुणाला जावेद तुला दिसत नाही का असे बोलला असता त्याचा राग आल्याने त्यात तरुणांसह आणखी अन्य तीन जणांनी जावेदसोबत वाद घातला तसेच तिघांनी त्याला पकडून ठेवले. तर एकाने लोखंडी पट्टी सह लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेत जावेद हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here