लाखो रुपये घेऊन पत्नीला नांदवण्यास नकार देणाऱ्या ५ जणांसह नवऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये घेऊन पत्नीला नांदवण्यास नकार देऊन तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली इस्ट येथे २०१४ ते जुन २०२०या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती टोनी नारायण परमार (वय-३४), नणंद रुपल मेहुल वाघेला, मेहुल वाघेला, सासु नर्मदा नारायण परमार, सासरे नारायण मंगलदास परमार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे टोनी परमार याच्यासोबत २०१४ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पती आणि सासरच्या लोकांनी पीडित महिलेच्या आई-वडील आणि भावाला वेगवेगळी कारणे देऊन ३५ ते ४० लाख रुपये घेतले. तसेच मुलाच्या आजरपणाची कारण सांगत पैसे घेतले. पैसे घेऊनही आरोपींनी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली. सततच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here