घरात घुसून २६ वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : येथील हिंजवडीमध्ये एका २६ वर्षीय नवविवाहित महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील सुसगांव येथे गुरुवारी (दि.16) घडली आहे.याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-४० रा.सुसगांव, मुळशी) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) दुपारी १२.३० ते १२.५० या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर व पोलीस उपनिरीक्षक काकडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here