पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथे १९ वर्षीय मुलीवर तिच्या मित्रानेच जबरदस्तीने शारीरिकसंबंध प्रास्थापित करून त्याचा न्यूड व्हीडीओ चित्रीत केला. त्यानंतर तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन जणांनी देखील मुलीवर आत्याचार केला. १५ डिसेंबर २०२१ रोजी पिंपळे गुरव येथे हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एक आरोपी पिडीत मुलीचा मित्र आहे. त्याने मुलीला आपल्या घरी बोलवून तिच्याशी जबरदस्ती शारीरिकसंबंध प्रस्थापित केला व त्याचा न्यूड व्हीडीओ चित्रीत केला. त्यानंतर यावेळी दुस-या आरोपीने देखील मुलीवर आत्याचार केला. त्याच दिवशी रात्री पिडीत मुलीला फोन करून न्यूड व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पिडीत घाबरल्याने पुन्हा आरोपीच्या घरी पोहोचली, त्यावेळी तिन्ही आरोपींनी पुन्हा एकदा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी १९ वर्षीय पिडीत मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपायुक्त परिमंडळ २ मार्फत सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६ (ड), ५०६ (१) माहिती तंत्रज्ञान कलम ६६ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.






