रावेर (प्रतिनिधी) : येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी सकाळी ९.३० वा.दोन महिलांकडून कोट्यावधी रुपयांची ब्राउन शुगर जप्त केल्याची घटना घडल्याची जोरदार चर्चा होत असून, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक फैजपूर, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस अधिकारी दाखल झाले असून, या घटनेच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.
सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन महिला ब्राउन शुगर घेऊन रावेरात डिल करत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती, त्यानुसार मागावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन संशयित महिलांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे.
दुपारी उशिरापर्यंत तपास सुरू असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले, रावेर पोलीस निरीक्षण कैंलास नागरे, तर तहसीलदार उषाराणी देवगुणे व शासकिय पंच या ठिकाणी हजर झाले आहे.






