नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील नवीन नाशिक परिसरात दगडाच्या खाणी जवळ साचलेल्या पाण्यात आपल्या भावंडांसोबत खेळायला गेलेला ९ वर्षीय मुलाचा पाण्यात पाय घसरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घरकुल जवळील खडी क्रशर परिसरात घडली शिवारात घडली.
अंबड परिसरातील चुंचाळे, घरकुल शिवारामध्ये राहणारा आयान रफिक शेख (वय ९) हा चुंचाळे परिसरातील दगडी खाणीजवळ साचलेल्या पाण्यामध्ये आपल्या लहान लहान भावांसोबत खेळायला गेला होता.
यावेळी आयान याचा पाण्यात पाय सटकला यानंतर त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे वडील हबीब शेख हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात ते घराबाहेर गेले असताना चारही मुले खेळायला गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला असल्याचे समजते.






