अहमदनगर (प्रतिनिधी) : हाता तालुक्यातील जळगाव परिसरात एका चार वर्षाच्या मुलीवर एका ३२ वर्षाच्या इसमाने अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सिकंदर हुसेन शेख याच्या विरोधात अत्याचार व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
राहाता तालुक्यातील जळगाव परिसरात राहणारी या चार वर्षीय चिमुरडीला गावात राहणार्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या याने उसाच्या शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी अत्याचारीत चिमुरडीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या याच्याविरुध्द बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे करत आहेत.






