दि. २१ डिसेंबर राशिभविष्य : कर्क राशीत जाणारा चंद्र अनेक राशींसाठी ठरेल शुभ व भाग्यदायी

  rashi-bhavishya

  मेष -दिवसाची सुरुवात उर्जावान असेल. त्यामुळे कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल करण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. कौटुंबिक जीवनात लहान भावंडांशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. आईची बिघडलेली तब्येत हळूहळू सुधारेल. सामाजिक स्तरावर संयमी व्यवहार करा.

   

  वृषभ – आई-वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. काही लोकं संध्याकाळच्या वेळी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज बघू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उधारी चुकती होईल.

  मिथुन – आज चंद्र तुमच्या लग्न स्थानातून द्वितीय स्थानी संचार करतील. त्यामुळे काही लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. दिवसा मावळताना मनाची चंचलता कमी होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. कला क्षेत्रातील लोकांना कला दाखवण्याची संधी मिळेल.

  कर्क – राशी स्वामी चंद्र याच कर्क राशीत संचार करतील. मानसिक दृष्ट्या सकारात्मक बदल दिसून येतील. अनावश्यक चिंतांपासून मुक्ती मिळेल. व्यापार करत असाल तर जोडीदाराच्या सहाय्याने लाभ होऊ शकतो. अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लोकांच्या अनुभवात भर पडेल.

   

  सिंह – आज परदेशी स्त्रोतांपासून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे खर्च करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांवर सहकाऱ्यांच्या सहायाने तोडगा निघू शकतो. बाहेरचे अन्न खाण्यापासून दूर राहिले पाहिजे.

  कन्या – धनलाभासाठी केलेल्या योजनांमधून तुम्हाला आज लाभ मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मनात तुमच्याबद्दल असलेला कडवटपणा नाहीसा होईल. सामाजिक स्तरावर तुम्ही लोकांची मदत करताना दिसून याल, त्यामुळे तुमची प्रतिमा सुधारेल. काही कामास्तव लांबचा प्रवास करावा लागू शकतो.

   

  तूळ – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाऊ शकते, त्यात तुम्हाला सहकाऱ्यांची साथ मिळेल. वडिलांसोबत झालेला मतभेद आज त्यांच्याशी बोलून मिटवून टाकाल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आधी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या.

  वृश्चिक – आज धार्मिक व अध्यात्मिक स्वरूपात लोकं सक्रिय दिसून येतील. सामाजिक स्तरावर धार्मिक कामात सहभाग घेऊ शकता. कौटुंबिक जीवन सुखद असेल, आई-वडिलांच्या आशिर्वादाने बिघडलेली कामे मार्गी लागतील. नशिबाची साथ मिळेल तसेच एखाद्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

  धनू – आज धनू राशीच्या लोकांना तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका अन्यथा पोटासंबंधी तक्रार उद्भवू शकते. जे लोग रहस्यमय विषयात कार्य करत आहेत जसे की – ज्योतिष, विज्ञान इत्यादी त्यांना अनुकूल फळ मिळेल. व्यावसायिकांना दिवसा अचानक लाभ मिळण्याचा योग आहे. सामाजिक स्तरावर संतुलित व्यवहार असावा.

  मकर -आज जोडीदाराला त्याच्या आवडीची वस्तू भेट देऊ शकता परिणामी वैवाहिक जीवन सुखी होईल. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना जुन्या प्रकल्पातून फायदा होऊ शकतो. सामाजिक स्तरावर तुमच्या कामाची प्रशंसा होईल. शिक्षण क्षेत्रात अडचणी असतील तर आई-वडिलांशी सल्ला-मसलत करा.

  कुंभ – तब्येतीबाबत निष्काळजीपणा त्रासदायक ठरू शकतो. एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर वेळेवर औषधे घ्या. कार्यक्षेत्रात विरोधक तुमच्याविरोधात कट करू शकतात, सावधान राहणे चांगले असेल. सासरच्या लोकांकडून या राशीच्या लोकांना आज लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सामान्य असेल.

  मीन -शिक्षण क्षेत्रात मीन राशीचे विद्यार्थीसाठी आज संधी मिळू शकते. प्रेम जीवनात चांगले बदल दिसून येतील. मुलांच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो. सामाजिक स्तरावर मान-सन्मानात वाढ होईल. आज रक्तासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तब्येतीची काळजी घ्या.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here