काशीयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंना सागर झोडगे युवामंचतर्फे मेडीकल किट वाटप

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : चाळीसगाव तालुक्यातील विश्वकर्मा टूर्स आणि ट्रॅव्हल्स तसेच नर्मदा यात्रा कंपनी आयोजक ह प भ संत सेवक कैलास महाराज गवळी पातोंडेकर यांच्यामार्फत विविध प्रकारच्या यात्रा राबविल्या जातात.



चाळीसगावात मोठ्या प्रमाणावर धार्मिक संस्कृती जोपासली जाते .तरी अशा यात्रेच्या च्या माध्यमातून तिच्यात अजून भर पडतो. यात संत सेवक कैलास महाराज गवळी हे राबवित असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग असतो. आता १८ तारखेला श्रीक्षेत्र काशी येथे जाणाऱ्या १२५ भाविकांना सागर भाऊ झोडगे युवा मंच व चाळीसगाव मेडिकल हाऊस यांच्यातर्फे अत्यावश्यक सेवा म्हणून मोफत मेडिकल किट व औषधे वाटप करण्यात आले.



यात्रेकरू सकाळी पाच वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून काशी येथे निघालेत त्यावेळी सागरभाऊ झोडगे युवा मंच यांच्याकडून त्यांच्या सदस्यांनी कैलास महाराज गवळी यांच्या हस्ते या भाविकांना मेडिकल किटचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here