दि. २४ डिसेंबर राशिभविष्य : शुक्रवार : सिंह राशीमध्ये असताना चंद्राचा कोणत्या राशीवर प्रभाव कसा असेल जाणून घेऊया

  rashi-bhavishya

  चंद्र एकमेकांच्या केंद्र स्थानी असल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. आज मघा नक्षत्र प्रभावात असेल. या स्थितीत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. ताऱ्यांचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम पाहूया…

   

  मेष
  कौटुंबिक जीवनात बुद्धीच्या जोरावर घरातील सदस्यांबरोबर ताळमेळ ठेवण्यात यश येईल. प्रेम जीवनात प्रेयसी बरोबर वाद-मतभेद झाला असेल तर आज तुम्ही त्यांना मनवू शकता. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होईल त्यामुळे शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील. मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

  वृषभ
  चंद्र आज चौथ्या स्थानी असल्याने आईकडून लाभ मिळू शकतो. आज कमालीची सहनशीलता असेल त्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्र व सामाजिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण कराल. आईकडच्या मामा, मामी, मावशी, आजोबा, आजी यांच्याशी भेट होऊ शकते तसेच दिर्घ संवाद होऊ शकतो. आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून जीवनाचा अनुभव व ज्ञान मिळू शकते.
  मिथुन
  काही लोकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आनंदाची बातमी मिळू शकते. साहसी काम करणाऱ्या लोकांची कमाई चांगली होऊ शकते. लहान भावंडांबरोबर मनोरंजनाचे क्षण घालवू शकता. अतिआत्मविश्वासाने कोणतेही काम करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते.

  कर्क
  आज एखादी कार्यक्षेत्रातील नवीन कल्पना वरिष्ठांच्या पसंतीस उतरू शकते आणि त्याचे कौतुकही होऊ शकते. दूरच्या नातेवाईकांची खबरबात मिळू शकते. मार्केटिंग आणि सेल्स संबंधी लोकांचा दिवस अतिशय सुंदर जाईल. बोलण्याची कला अवगत केल्याने तुम्ही लोकांची मने जिंकू शकता आणि सामाजिक स्तरावर तुमची ओळख निर्माण होईल. आज ८८% नशिबाची साथ आहे.

  सिंह
  चंद्र आज लग्न स्थानी असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद असतील तर मध्यस्थी करून ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. शारीरिक व मानसिक बदल दिसून येईल. दिर्घ आजाराने त्रस्त असल्यास आज थोडा आराम मिळू शकतो.


  कन्या

  आज मन अस्वस्थ असू शकते. मनात नकारात्मक विचार रुंजी घालतील. कर्ज घ्यायचे असल्यास विचारपूर्वक घ्या. बाहेरगावी जाणार असाल तर सामानाची विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा किंमती समान चोरी होण्याची भीती असेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून लाभ होऊ शकतो.

  तूळ
  या लोकांना विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा होऊ शकतो आणि मनातून आनंदाचे वातावरण असेल. विदेशात जायचे असल्यास आज सतत प्रयत्न करा, काम मार्गी लागू शकते. भाऊ-बहिण मित्रांसारखे साथ देतील, त्यांच्याकडून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन देखील मिळेल. शुक्र ग्रहाच्या ओम शुं शुक्राय नमः या बीज मंत्राचा जप करा.

  वृश्चिक
  कार्यक्षेत्रात अडकलेल्या योजना निकालात काढण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करताना दिसून याल. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात संतुलन येईल. आई-वडिलांशी मन मोकळे करू शकता. रात्रीच्या वेळी घरातील लोकांबरोबर पार्टी करू शकता.

  धनू
  गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या मानसिक समस्येतून सुटका होईल. शारीरिक व मानसिक रीतीने चांगले परिणाम दिसून येतील. धार्मिक कार्यात आवड वाढेल. नशिबाची साथ मिळेल. चंद्र तुमच्या नवव्या स्थानी असेल. संध्याकाळच्या वेळी जुन्या मित्रांची भेट होईल.

  मकर
  मकर राशीच्या लोकांसाठी अचानक लाभाची स्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मद्य सेवनापासून लांब रहा. ज्यांचे वय ५० च्या वर आहे त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विनाकारण चिंता त्रास देतील.

  कुंभ
  तुमचा बोलका स्वभाव काहींना आकर्षित करू शकतो तर काहींच्या मनाला बोचू शकतो. कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव असतील. विवाहित लोकांना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. संध्याकाळच्या वेळी जोडीदार किंवा घरच्यांसोबत पार्टी करू शकता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो.

  मीन
  घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आजचा दिवस लाभदायक असेल. कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावधान राहण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा महागात पडू शकतो. जुन्या समस्येमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here