चाकण येथे गोळ्या झाडून तरुणाचा खून

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : चाकण परिसरात पिस्तूलातून गोळ्या झाडून तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री घडली आहे.नागेश कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील एका आठवड्यात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

पिंपळे सौदागर येथे 18 डिसेंबर रोजी एका सराईत गुन्हेगाराचा पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपी पोलिसांना आव्हान देऊन पसार झाला. 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाचा खून झाला. हातोडीने डोक्यात मारून निर्घृणपणे चुलत भावाने मित्राच्या मदतीने हा खून केला.

त्यानंतर याच दिवशी चाकण येथे देखील खुनाची घटना घडली आहे. एका आठवड्यात तीन खून झाल्याने शहर हादरले आहे. या खुनाचे कारण आणि आरोपींबाबत माहिती मिळाली नाही. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here