मामाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २५ वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : घरी आलेल्या मामाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास न्यायालयाने २५ वर्षे सक्‍तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांना हा आदेश दिला. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त चार वर्षे कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

शिक्षा सुनावलेला २० वर्षीय तरुण हा कोथरूडमध्ये राहायला आहे. दि. १ एप्रिल २०१९ रोजी शास्त्रीनगरमध्ये हा प्रकार घडला होता. या अत्याचारप्रकरणी तिच्या मावशीने कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली. पीडित ही येरवडा येथे रहायला आहे. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने ती तिच्या मावशीकडे कोथरूड येथे आली होती. घटनेच्या दिवशी ती आत्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आत्याचा मुलगा एकटाच होता. त्याचा फायदा घेत त्याने अत्याचार केला.

त्यामुळे तिने मुलाच्या कानाखाली मारली व ती तेथून मावशीच्या घरी निघून गेली. फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला रडताना पाहिले. चौकशी केली असताना तिने घटनेची माहिती दिली. गुन्ह्याचा तपास कोथरूडच्या तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. जानकर यांनी केला. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी पाहिले. त्यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here