लग्नात नाचताना धक्का लागला; युवकावर थेट कोयत्याने वार

attack-by-koyata

नाशिक (विशेष प्रतिनिधी) :  शहर परिसरात दिवसेंदिव गुन्हेगारी वाढत आहे.अगदी क्षुल्लक कारणावरुन प्राणघातक हल्ला करण्याचे प्रमाणही वाढत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून युकावर थेट कोयत्याने वार करण्यात आले आहेत. यात युवक गंबीर जखमी झाला आहे. शिखरेवाडी मैदानाजवळ हा प्रकार घडला आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साने गुरूजी नगर, महाजन हॉस्पिटलमागे राहणा-या ज्योती राहुल चाफळकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, किरण चाफळकर यांच्या जावयाच्या मुलाचे लग्न होते. लग्नात बोलवलेले नसतानाही विशाल चाफळकर, अजय चाफळकर हे येऊन नाचत होते. नाचताना धक्का लागल्यावरून भांडण झाले. यावेळी विशाल व अजय चाफळकर यांना लग्नाच्या स्थळावरून काढून देण्यात आले. दरम्यान, राहुल बाबूलाल चाफळकर (32) हा शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास शिखरेवाडी मैदानाच्या रस्त्यावरून जात होता. विशाल व अजय चाफळकर यांनी लग्नातील वादाची कुरापत काढत राहुलच्या पोटात कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच, राहुलला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याचप्रकरणी दुसरी फिर्यादही दाखल झाली आहे. साने गुरूजी नगर येथील पुष्पा विजय चाफळकर यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवाजी पुतळ्याजवळ राहूल बाबूलाल चाफळकर, नितीन अनिल पुसळकर, प्रविण दिलीप पुसळकर (रा. साने गुरूजी नगर) यांनी कारण नसताना शिवीगाळ करून डोक्यात काहीतरी मारून दुखापत केली. उपनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here