दि. २७ डिसेंबर राशिभविष्य : कन्या राशीतील चंद्र ठरेल ‘या’ राशींना लाभदायक

  rashibhavishya

  मेष : आज चंद्र तुमच्या सहाव्या स्थानी असल्याने तुमच्या संयम आणि क्षमतेची परीक्षा घेऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची दृष्टी तुमच्या कामावर असू शकते, त्यामुळे हुशारीने वागा. या राशीच्या लोकांना विरोधकांपासूनही सावध राहावे लागेल. सासरच्या लोकांशी संभाषण करताना हुशारीने शब्द वापरा, अन्यथा तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

  वृषभ : या दिवशी प्रेमात पडणाऱ्या लोकांना अनुकूल परिणाम मिळतील, त्यांना प्रियकर-प्रेयसीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. जे घरापासून दूर राहतात त्यांना या दिवशी काही कामासाठी घरातून फोन येऊ शकतो. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लोकांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला शाळेत एखादी भेटवस्तू मिळू शकते.

  मिथुन : मिथुन राशीच्या लोकांच्या मनात आईच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते. तथापि, कौटुंबिक जीवनासाठी आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. ज्यांना वाहन सुख हवे होते, त्यांचे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे आज त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. तब्येतीची थोडी काळजी घ्या.

   

  कर्क : आज चंद्र तुमच्या तिसऱ्या स्थानी संचार करेल, त्यामुळे धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. जे लोकं साहसी काम करतात त्यांना फायदा होऊ शकतो. सैन्य आणि पोलिसात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असू शकतो. मात्र, तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा सामाजिक स्तरावर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

  सिंह : आज तुमच्या वागण्यात आत्मविश्वास दिसून येईल, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास निर्माण होईल तसेच तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. जर वडिलोपार्जित मालमत्तेबाबत खटला चालू असेल तर तुम्हाला त्यात विजय मिळू शकतो. रात्री कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल.

  कन्या : या राशीच्या लोकांना आज त्यांच्या जीवनसाथीकडून भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर व्हाल. व्यवसायात काही नुकसान झाले असेल तर आज तुम्ही त्याचे नफ्यात रूपांतर करू शकता. सामाजिक स्तरावर एखाद्या मित्राला भेटून तुम्हाला बरे वाटेल. जर तुम्ही राजकारणाच्या क्षेत्राशी निगडीत असाल तर भाषण प्रभावाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकता.

   

  तूळ : जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर आज तुम्ही सावध राहा. चंद्र तुमच्या बाराव्या स्थानी आहे, त्यामुळे या दिवशी तुमची आध्यात्मिक विषयात आवड वाढेल. आज तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहावे लागेल जे नकारात्मक बोलतात, यामुळे तुमच्यातही नकारात्मकता प्रवेश करू शकते. काही मनोरंजक पुस्तके वाचून तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता.

  वृश्चिक : या राशीच्या लोकांना आज लाभ मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु तुम्हाला संधी ओळखता येणे आवश्यक आहे. व्यापार्‍यांना या दिवशी परदेशातून पैसे मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल, तुम्हाला मोठ्या भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.

  धनु : कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी लोकांशी संवाद साधताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरावेत. दहाव्या स्थानी असलेला चंद्र आज तुम्हाला खंबीर बनवेल, यासोबतच काही लोक त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतात. वडिलांशी तुमचे संबंध सुधारतील.

   

  मकर : जर तुम्ही मित्रांसोबत नवीन स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना आखू शकता आणि काहींची ही योजना आकारास येऊ शकते. या दिवशी धार्मिक विषयात रुची वाढेल तसेच धार्मिक पुस्तकांचा अभ्यासही काही लोकं करू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराचे म्हणणे न बोलताही जाणून घेऊ शकता, ज्यामुळे वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात.

  कुंभ : आज, तब्येत थोडीशी ढासळू शकते, म्हणून योग्य ते योग्य प्रमाणात खायाले पाहिजे. संध्याकाळी थंड पदार्थ खाणे टाळावे. ज्या लोकांकडून तुम्हाला लाभाची अपेक्षा नव्हती त्यांनाही आज अचानक लाभ मिळू शकतो. काही लोकं आईच्या तब्येतीच्या काळजीने त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतात.

  मीन : मीन राशीच्या लोकांना या दिवशी त्यांच्या जीवनसाथीदारामध्ये खऱ्या मित्रत्वाचे दर्शन होऊ शकते. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. सामाजिक स्तरावर, तुम्ही तुमच्या प्रभावी बोलण्याच्या कौशल्याने क्रॉस-जेंडर लोकांना आकर्षित करू शकता, जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. आईकडून एखादी दु:खद बातमी मिळू शकते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here