नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) : शेतकऱ्यांचे दैवत तसेच , असंतोषाचे जनक या क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ,थोर समाजसेवक यांच्या नावावर महा विकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांना आश्वासित करून कर्ज माफी योजना, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घोषणा केली होती, ही कर्ज माफी योजना पूर्णतः फोल व फसवणुकीची ठरली आहे , कारण या कर्जमाफी योजनेमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रामाणिक शेतकऱ्यां साठी प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपयाची घोषणा या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने कडून करण्यात आली होती.
पण शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने ही घोषणा फोल ठरली, अद्यापही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर ही बाब अंत्यंत अन्याय करणारी ठरली असून अनेक वेळा आघाडी सरकार च्या मंत्र्यांना व सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आनुनही काही ही कार्यवाही होताना दिसत नाही , नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात यवतमाळ जिल्ह्याचे आमदार डॉ, संदीप धुर्वे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी लावून सभागृहाचे व शासनाचे लक्ष वेधून घेतले , शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न मांडून अवघ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मन जिंकून घेतली.
नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सक्तिच्या कर्ज वसुली संदर्भात झालेल्या बैठकीत नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करून देणे संदर्भात विषय मांडुनही अद्याप ही जिल्हा बँक कडून काही ही सकारात्मक निर्णय होत नाही.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना ५० हजाराचे अनुदान केंव्हा मिळणार? शेतकऱ्यांचा सवाल






