नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – अक्कलकुवा शहरातील शेवाळी- नेत्रंग महामार्गावरील वरखेडी नदीवरील पुलाची अतिशय दुरावस्था झाली असून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच अर्धा ते एक फुटाचे खड्डे पडल्यामुळे वाहने निघणे मुश्कील झाले आहे. तरी संबंधित महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देऊन पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष विनोद कामे यांनी लेखी निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदन तहसीलदार सचिन मस्के यांना देण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी, अक्कलकुवा भाजपा तालुकाध्यक्ष विनोद कामे, विनोद जैन,उमेश पाडवी, रोहिदास लोहार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार अक्कलकुवा शहरातील वरखेडी नदीवरील पूलाची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी; अन्यथा भाजपाचा आंदोलनाचा...







