श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र खान्देश विभागीय संपर्कप्रमुख पदी समाधान प्रभाकर माळी यांची निवड

चोपडा (संदीप ओली) – श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन आणि प्रदेश प्रवक्ता अजिंक्य फुले तसेच प्रदेश कार्याध्यक्ष कैलास शिंदे,खान्देश विभागीय अध्यक्ष संजीवकुमार,खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी यांच्या मागदर्शनाखाली चोपडा येथील समाधान प्रभाकर माळी यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य खान्देश विभागीय संपर्क प्रमुख पदी
निवड झाली.त्याबद्दल त्यांना सर्व वरीष्ठ पदाधिकार्यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच चोपडा,धरणगाव एरंडोल,रावेर,जामनेर,धुळे नंदुरबार,शिंदखेडा शहर कार्यकारणी व तालुका कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन,नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश लहासे,शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद माळी,जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन,जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र माळी तसेच चोपडा शहर आणि तालुक्याचे समस्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here