दोंडाईचा (जेष्ठ पत्रकार दौलत सूर्यवंशी) –
दरणे ता. शिंदखेडा येथील पत्रकाराचा भाऊ ऑक्सिजन अभावी का? ऑक्सिजनच्या सेवा पुरवण्याअभावी मयत झाला, हे सत्य बाहेर येणे गरजेचे. …
करोना काळात सर्वदूर म्हणजे ह्या देशापासुन, त्या देशापर्यंत ह्या आजाराची कमी अधिक प्रमाणात लागण, भिती असतांना .ह्या आजाराला हरवण्याची सर्व दारोमदार ज्यांच्यावर अवलंबून आहे, असे महसुल , पोलीस, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्र म्हणजे खासकरून वैधकीय क्षेत्रातील माणुसकी करोना काळात मरत आहे का? असा संतप्त सवाल करोना काळात विविध आजाराशी बाधित असलेल्या सर्व रूग्ण प्रति जनतेच्या मनात येत आहे. कारण काल येथील उपजिल्हा रुग्णालयात दराने ता. शिंदखेडा गावातील एका व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचार ,ऑक्सिजन मिळावा म्हणून दाखल करण्यात आले. मात्र एकवेळा ऑक्सिजन मिळाल्यावर बरे वाटल्यावर पुन्हा श्र्वासोश्र्वासचा त्रास जाणवू लागल्याने ऑक्सिजन पुन्हा वेळेवर मिळाले नसल्याने जीव गमवावा लागला आहे. म्हणून पेशंटच्या नातेवाईक पल्स पत्रकार असलेल्या भावाने प्रत्यक्षदर्शी पंचवीस मिनिटांपर्यंत धावपळ करत ड्युटीवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधीक्षकपासुन नर्स, वार्ड बाॅयपर्यंतच्या लोकांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र प्रत्येकाने हे माझे काम नाही, त्याठिकाणी माझी ड्युटी नाही, तेथे अमुकतमुक डॉक्टर ड्युटीवर आहेत, त्यांना जावून सांगा, अशी निरनिराळी उत्तरे देत. पंचवीस मिनिटांपर्यंतची वेळ मारून नेली आणि अशातच पेशंटने जीव सोडला. म्हणून पेशंटच्या भावाने उपजिल्हा रुग्णालयातील करोना काळातील सेवेबाबत रोष व्यक्त करत आगतांडव केला. जो पर्यंत वरिष्ठ पातळीवरून वैद्यकीय चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत मी मयत भावाचे प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका घेतली. तसेच माझा भाऊ ऑक्सिजन अभावी का? ऑक्सिजन असल्यावर सेवा न मिळण्या अभावी मयत झाला याचाही खुलासा प्रशासनाने करावा व दोषी असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कडक शासन करावे, अशी अट घालून परिसर तापवून टाकला. थोड्याच वेळात हा विषय स्थानिक माध्यमापासुन जिल्हा सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेत स्थानिक टीम त्याठिकाणी पाठवली, व खरी परिस्थितीची माहिती जाणून घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासीत करत संबंधितांकडून जबाब मागविण्यात आले. म्हणून तक्रार कर्त्या पत्रकारानेही परिस्थिती पाहून समजूतदारपणा घेत अंतविधी करण्यास होकार दिला व झालेल्या घटनेवर तात्पुरता पडदा पडला.
करोना काळात माणूसपेक्षा माणुसकी मरत असल्याचा प्रकार चोहीकडे. ….
करोना काळात एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी जीव पणास लावून सेवा देत असताना काही अपवाद वगळता बर्याच ठिकाणी विविध आजाराशी बाधित व सर्दी, खोकला, ताप यापैकी एखाद्या आजाराशी निगडीत रूग्णांना कटू अनुभवास सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी यांना त्रास झाल्यावर साधे विचारले जात नाही आहे, हॉस्पिटलच्या दारावर उभे राहिल्यावर व्यवस्थित उत्तरे दिली जात नाही. उपचार करण्यास सांगितले तर नकार दिला जातो. वेळप्रसंगी सरळ सरकारी हॉस्पिटलचा रस्ता दाखविण्यात येतो, आणि उपचार सुरू केलाच तर दक्षणाही दाबून घेतली जात आहे. मागे एका महाभागाने नगरसेवक पुत्राचा पांढर्या पेशी कमी असल्याचा नावाखाली उपचार सुरू केला आणि त्यानंतर निमोनिया, तद्नंतर करोना सस्पेक्ट सांगून , हात लावायला पण नकार देत. सरळ नासिक येथे उपचारास पाठविले, अशावेळी तो रूग्णही बाधित, त्याच्या परिवारालाही क्वांरनटाईन करण्यात आले आणि डॉक्टर, स्टाॅपसह हॉस्पिटलला क्वांरनटाईन करत सील करण्यात आले. ह्या सर्व परिस्थिती ह्या महावैधकीयभागाने रोज माणूस पाठवून बीलचा तगादा लावला व सोबत जो स्टाॅप क्वांरनटाईन झाला त्यांचे जेवण आम्ही घरून दिले असुन जास्तीचे जेवणाचे चार हजार रूपयांची मागणी केली. आता हे बील संबधीत रुग्णाने दिले नाही दिले हा माणुसकी आर्थिक दर्शविणारा व पाहण्यावरती अवलंबून आहे. यासारखीच स्ट्रीटमेटं गावातील प्रतिष्ठीत साजेश प्लावुड, हार्डवेअर मालक यांच्यासोबत देखील केली. नेहमी रोज संध्याकाळी पायी फिरायची सवय असलेल्या माजी उपनगराध्यक्ष यांना रामी रस्त्यावर फिरतांना अचानक चक्कर व छातीत धाप लागल्याचा भास होऊ लागल्याने, त्यांनी थोडावेळ विसावा घेत. मित्रांच्या साहाय्याने हॉस्पीटल गाठले. यावेळी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर असल्यावरही तपासणीसाठी नकार देत. पायर्या वरूनच खाली पाठविले. अशावेळी संबधीत ठिकाणी असलेल्या पॅथालाॅजी धारकाने वेळ सांभाळत समोरच्या व्यक्तीस धीर देवुन तपासणी करून, फोनवरून डॉक्टरचा सल्ला घेत. पेशंटला घरी जाण्याचा सल्ला दिला. यानंतर करोना काळात नगरसेवक, नगरसेवक मित्र इंजिनिअर, नवलनगर येथील शिक्षक व आता दोन दिवसापूर्वीच व्यापारी शहा रेग्युलर आपलाच पेशंट असल्यावरही तो व्यक्ती किरकोळ त्रास झाल्यावर तपासणीसाठी आला असता, त्यालाही खालच्या खाली परत पाठवण्यात आले. आता हे झाले एखाद्या ठिकाणचे ठराविक उदाहरण. यांसारखी अगणित उदाहरणे जिल्ह्य़ाभरातील देता येतील. म्हणजे ज्यांच्यावर आज ह्या करोना सारख्या भीषण आजाराला हरवण्याची दारोमदार आहे. तेच वैधकीय लोक जर सरकारने सर्व पीपीई किट पासुन सुरक्षा प्रधान केल्यावरही रूग्णांना सेवा देतांना अडचणी करत असतील तर माणसांनी ह्या गंभीर आजारात जगण्याची आशा कोणाकडे बाळगावी.
आज ह्या कठीण काळात, संकटसमयी प्रत्येक माणूस माणुसकी विसरून जगू लागला. तर जग खरच चालेल का? म्हणजे भाजीपाला, किराणा विक्रेत्यांने एखाद्या गरजवानाला वेळेवर भाजीपाला,किराणा असल्यावर दिला नाही. किंवा आलेल्या व्यक्तीला खालच्या खाली, खाली हात परत पाठविले तर खरंच आपल्या जवळ असलेल्या स्कीलचा योग्य वापर केला असे म्हणणे योग्य ठरेल का?. म्हणून जेव्हा जेव्हा देशावर असे व इतर प्रकारचे संकट आले आहे. तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्यात असलेल्या प्रतिभेतुन देशास वाचवण्यास, सावरण्यासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देऊन जनतेसमोर साक्षात्कार घडवून दिला आहे, अशी अनेक ऐतिहासिक उदाहरणे आहेत. म्हणजे सरकार समुद्रावर जेव्हा संकट येते. तेव्हा समुद्रात त्यांनाच उतरायला सांगते , ज्यांना समुद्राच्या पाण्यात उतरायची सवय आहे. देशाच्या बॉर्डरवर संकट आले तर सैनिकांना प्रथम पाटवते . तेव्हा सरकार सर्वसामान्य जनतेला त्याठिकाणी पाठवत नाही, आज देशावर व ग्रामीण भागापर्यंत करोना विषाणूंचा जो कहर, व्याप्ती, भिती सर्वसामान्य व्यक्तीत आहे. तीला वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीच कमी करून हरवू शकतात. पण तेच जर सरकारने सर्व पीपीई किटसह सुरक्षा कवच प्रधान करून पेशंटला हात लावायला घाबरून उपचार करण्यास दिरंगाई करत असणार व पेशंटचा जीव जात असेल पर्यंतची काळाची वाट बघत असणार तर वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री घेउन काही फायदा नाही.
आज इतर देशात करोना सारख्या भयंकर आजाराने रोडावर जसे लोक मरत असतानाचे चित्र रेखाटले गेले. तशी मात्र आपल्या देशात परिस्थिती नाही. आज जी ही व्यक्ती मरत आहे. ती प्रोढ असुन, त्यांना ह्या आजारासोबत इतरही अनेक व्याधी आहेत. तसेच आता जशी करोना बाधिताची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. तशी बर्याच मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा कमी वेळात रिलीपही मिळत आहे. म्हणून देशातील सरकारने जो विश्वास, भरोसा आपल्या स्कीलवर ठेवला आहे. तो आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवाची बाजी लावत एखाद्या पेशंटचा जीव वाचवला तरच त्यांची किंमत ठरेल. एरवी माणूस तसा मरण्यासाठीच ह्या पृथ्वीवर आलेला आहे, अशा जनभावना पत्रकारांच्या मयत झालेल्या भावाच्या वेळी गावात उमटत होत्या.







