वेब सीरिजमध्ये काम देण्याचे आमिष देत अभिनेत्रीचे काढले अर्धनग्न फोटो; तरुणास अटक

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : स्वप्ननगरीत कामाच्या शोधात आलेल्या एका बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आपण कास्टिंग डायरेक्टर आहोत असं सांगून फसवणाऱ्या एका २४ वर्षांच्या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे लुटत होता.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मालाड सायबर पोलिसांनी ओम प्रकाश तिवारी (वय २४) या तरुणाला अटक केली आहे. या भामट्याने फेसबुकवर आपण कास्टिंग डायरेक्टर आहे असं सांगत होता. या आरोपीने आधी काही ठिकाणी काम सुद्धा केले आहे. तरुणींना तो वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून त्यांचे फोटोशूट करायचा. त्यानंतर त्यांचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचा. या आरोपीने आपण नेटफ्लिक्स प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे असंही सांगत होता.



एका बंगाली अभिनेत्रीने डिसेंबर २०२१ महिन्यात फेसबुकवर संपर्क केला होता. त्यानंतर या अभिनेत्रीला मुंबईला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ओम तिवारीने या अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं आमिष दिलं. त्यानंतर या अभिनेत्रीचे ऑडिशनच्या नावावर फोटोशूट केले. त्यानंतर या अभिनेत्रीला त्याने काम तर दिले नाही, उलट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली.


पीडित तरुणी हे कोलकाता येथील राहणारी आहे. तिने याआधी बंगाली सिनेमात काम केलं होतं. कोरोनाच्या काळात हातात काम नसल्यामुळे ती मुंबईत काम करण्याच्या इराद्याने आली होती. पण, आरोपी ओम तिवारीने त्याचा गैरफायदा घेत पैसे वसुलीचे काम केले.




या प्रकरणी या तरुण अभिनेत्रीने मालाड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुला आयपीसी ३४५ ए, बी, ६७ ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या भामट्याला अटक केली. त्याने आणखी काही तरुणींना फसवलं असावं असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here