मेहरूण तलाव परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

jugar-aadda

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील मेहरूण तलाव परिसरात खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याठिकाणाहून जुगाराचे साहित्य आणि ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी आणि एमआयडीसी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलीसांनी संशयित आरोपी भुषण समाधान कोळी (वय-२० ), रा. तुकाराम वाडी, जळगाव, किशोर चिंतामन भोई (वय- ३८) रा. तांबापुरा,जळगाव, गजानन समाधान हटकर (वय-३५ ) रा. गावळी वाडा. तांबापूरा, योगेश भागवत जाधव (वय-२३) रा. अदित्य हॉटेल जळगाव रामेश्वर कॉलनी आणि दिपक किसन सोनवणे (वय-४१) रा. देव्हारी उमाळा ता.जि.जळगाव यांच्यावर कारवाई केली. पोलीस नाईक सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, योगेश बारी, रविंद्र मोतीराया, ज्ञानेश्वर खराडे, गोपाल सोमवंशी, आरसीपी प्लाटूनचे पो.कॉ. महेश महाले,चंदन दराडे, भूषण नन्नवरे, गणेश बढे, रूपेश पाटील, रमेश जाधव, अंकूश पवार यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here