उस्मानिया पार्क येथील तरूणाचा खुन अनैतिक संबंधातुन दोघांना ठोकल्या बेड्या

jalgaon-police

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : उस्मानिया पार्क येथील तरुणाचा ममूराबाद रोडवर गळा आवळुन खुन करणयात आला होता. हा खुन अनैतिक संबंधातुन करण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. शेख बशीर शेख सुपडु ( वय- ३३ ) आणि शेख फारुख उर्फ छोटू शेख शौकत ( वय- २१ ) दोन्ही रा. श्रीराम पेठ जामनेर, जळगाव असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.


या बाबत महिती अशी की, ममूराबाद रोडवर उस्मानिया पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार ( वय- ३५ ) या तरुणाचा मृतदेह आढळुन आल्याचे गुरुवारी खळबळ उडाली होती. या प्रकरणी जिला शासकीय वेघकीय महाविद्यालयत नातेवाईकांसह मित्रपरिवारची प्रचंड गर्दी जमली होती. मयत शेख गफ्फार याचा अज्ञात व्याक्तीने खुन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या गुनाहातील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान सायंकाळी मृतदेह शवच्छेन केल्यांतर गळा आवळुन खुन केल्याचे वैघकय अवहालात निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरुवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटिल, संजय हिरवरकर, राजेश मेंढे, सुनील दामोदर, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, निजामुद्दीन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटिल, अविनाश देवरे, संदीप सावळे, नितिन बाविस्कर, रंजीत जादव, चोर राठोड, राहुल पाटिल, संतोष मायकल, विनोद पाटिल, ईश्वर पाटिल, राजेंद्र पवार, भारत पाटील, अशोक पाटिल, दर्शन ढकणे, यांनी कारवाई करत दोन्ही संशयतांना गुन्हा घडल्यापासुन अवघ्या ८ तासात अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here