जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी कुसुंब्याच्या सुरेशदादा नगर झोपडपट्टी भागात टाकलेल्या धाडीत १२५० रुपयांची हातभट्टी दारु जप्त करुन आरोपी महिलाविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर यांनी एम.आई.डीसी. पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादिवरुन म्हटले आहे की, पो.हे.कॉ. गफ्फार तडवी ,पो. कॉ शांताराम पाटिल, मपोको अलका माळी, यांनी दिलेल्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सुरेशदादानगर झोपडपट्टी भागात कुसुंबा गावी आशा सोनवणे तिचे घराच्या आडोशाला बेकायदा हात भट्टीदारु विक्री करित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दुपारी १ वाजता पोलिसांनी छापा टाला मापोको अलका माळी यांनी पकडल्यावर चौकशी केल्यानंतर आशा विकास सोनवणे, ( वय-३२, रा. सुरेशदादानगर कुसुंबा ) हिच्या कब्जामधुन प्लास्टिक केन व १,२५० / रुपये किंमतीची ३५ लि, गावठी हातभट्टी तयार दारु जप्त करण्यात आली .
तपासासाठी नमुना वेगळा काढुन उर्वरीत दारु जागीच नाश केली आरोपी महिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीविरोधात म. प्रो ॲक्ट कलम ६५ (ई) , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







