जळगाव शहरात वेश्या व्यसायावर धाड; दोघांना अटक

जळगाव (क्राईम रिपोर्टर असलम खान) : औरंगाबाद महामार्गवर एमआईडीसी हद्दीलत हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको त्या अवस्थेत आढळुन आले.

 

काशिनाथ चौकानजीक असलेल्या हॉटेल अमरनाथ येथे सदर छापा टाकण्यात आला. जळगाव शहरातील औरंगाबाद रोडवरील अमरनाथ लॉजीगचे मालक लॉज मध्ये पुरुषांना काही महिला उपलब्ध करुन वेशा व्यसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. आज सायंकाळी साडे पांच वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या कारवाईत सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनखाली परिविक्षाधीन सहा. पोलिस अधिक्षक अशीद नामदेव कांबळे ( भापोसे ) , पो.नि प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ राहुल रगडे, मपोकॉ आशा पांचाळ, एसडीपीओ कार्यालयतील पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हे.का किरण धमके, यांच्यसह इतर कर्मचारी वर्गाने या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत दोन महिला व दोन पुरुष आढळुन आले.

 

यातील राजेश मिठाराम ठोंबरे रा. सोपानदेव नगर, जुना खेडी रोड व विकास रमेश सोनवणे, रामेश्वर कॉलनी या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. प्रत्येकी हजार रुपये घेऊन या लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिली जात होती. पो.नि प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनखाली दीपक चौधरी व राजेंद्र कांडेकर पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here